Nashik : नांदूर मध्यमेश्वरच्या शाश्वत विकासासाठी ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’

Nashik : राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकासासोबतच जैवविविधता संवर्धनाला चालना देण्यासाठी ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’ तयार करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, नाशिक आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.



ड्रोन, थर्मल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रभावी गस्त


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. अभयारण्यातील जलपर्णी आणि इतर आक्रमक वनस्पतींचे निर्मूलन, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी व बेटे तयार करणे तसेच जलगुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारण्याचा आराखड्यात समावेश आहे. वन्यजीव आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी ड्रोन, स्मार्ट ॲप आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रभावी गस्त व देखरेख व्यवस्था उभारण्यात येणार आहे. पर्यटकांना अभयारण्यातील जैवविविधतेचा अधिक चांगल्या पद्धतीने अनुभव घेता यावा यासाठी निसर्ग परिचय केंद्र, आधुनिक निवास व्यवस्था, कॉन्फरन्स रूम, वॉच गॅलरी, फ्लोटिंग ट्रेल आणि पक्षी निरीक्षण केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ई-वाहने, चार्जिंग स्टेशन तसेच पॅडल आणि कायाक बोटिंगसारख्या उपक्रमांनाही चालना दिली जाणार आहे.



शाळांमध्ये इको-क्लब स्थापन करणार


अभयारण्यालगतच्या १२ गावांतील स्थानिक युवकांना प्रमाणित निसर्ग व पक्षी मार्गदर्शक, होमस्टे आणि इको-कॅफे संचालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ३० टक्के निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याचे नियोजन आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने पक्षी रिंगिंग स्टेशन तसेच मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील पक्ष्यांच्या अभ्यासासाठी केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय ५० हून अधिक शाळांमध्ये इको-क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जैवविविधता, पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Nashik Crime News : नाशिक - मालेगावात ‘सर्च ऑपरेशन’, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त

Nashik Crime News : नाशिक शहर व मालेगाव परिसरात आक्षेपार्ह साहित्य ठेवल्याची गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथक व गाेपनीय

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली