Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द झाला असला, तरी २८ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करण्याचा किंवा मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सरकारने आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे त्या सर्व नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावीत, अशी आमची मुख्य मागणी आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी २० ते २५ ऑगस्ट दरम्यान गोदापट्ट्यात गाव बैठका आयोजित केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत आंदोलन करण्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज देण्यात आल्यामुळे या आंदोलनाचे लोण मुंबईपर्यंत पोहोचणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.


दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांच्या ५८ लाख नोंदींच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. राज्यात ५८ लाख नवीन नोंदी सापडल्या नसून हा १९८६ पासूनच्या जुन्या नोंदींचा एकत्रित आकडा असल्याचा दावा तायवाडे यांनी केला आहे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर केवळ ५९ हजार नवीन नोंदी सापडल्याचे सांगत, वारंवार ५८ लाखांचा आकडा समोर आणल्याने दोन्ही समाजांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती