Tuesday, August 18, 2026

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. निदा खानला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक रोड न्यायालयाने (Nashik Road Court) ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मतीन पटेल याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

​सोमवारी (दि. १७) पार पडलेल्या सुनावणीदरम्यान (Hearing) संशयित तौसिफ अत्तार (Tausif Attar) आणि निदा एजाज खान (Nida Ejaz Khan) हे दोघे न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. तर मुख्य संशयित दानिश शेख (Danish Shaikh) आणि मतीन पटेल (Matin Patel) यांना मध्यवर्ती कारागृहातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) द्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

यावेळी दानिश शेखच्या जामीन अर्जाला मूळ पीडित तरुणीच्या वकिलांनी विरोध करत न्यायालयात जबाब नोंदवला. त्यामुळे या खटल्यातील मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर न्यायालयाने कारवाई पुढे ढकलली असून त्यावर आता २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >