- कामाला गती देण्याच्या सूचना; गडचिरोलीत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र
मुंबई : पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या १० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित (Skyla Aquarium project) ‘स्कायला एक्वेरियम’ (मत्स्यालय) प्रकल्पाच्या प्रगतीचा सोमवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देतानाच, गडचिरोली जिल्ह्यात विभागीय पातळीवरील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मुंबई : "अनेक लोकांना मी दिल्लीत जावेसे वाटत असले, तरी मी ...
मंत्री राणे (Nitesh Rane) यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या आढावा बैठकीत पनवेल येथील प्रस्तावित ‘स्कायला एक्वेरियम’ (Skyla Aquarium project) प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण करण्यात आले. सुमारे १० एकर जागेवर आकार घेणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार असून, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना दुर्मिळ जलचर प्रजाती जवळून पाहता येणार आहेत. या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) तातडीने तयार करून मत्स्यव्यवसाय विभागाकडे सादर करण्याच्या सूचना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबई : कथित ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर बेछूट आरोप करणे आणि आक्षेपार्ह विधाने करणे नंदुरबारमधील भाजपचे नेते तथा माजी ...
त्याचप्रमाणे, गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी तेथे विभागीय स्तरावरील प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुण-तरुणींना मत्स्यव्यवसायाचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि स्थानिक अर्थकारणाला बळकटी मिळेल. या आढावा बैठकीस आमदार विक्रांत पाटील, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पदुम (पशू संवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)