Ashwini Bhide : सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करा, अतिक्रमित असेल तर कारवाई करा

- महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना निश्चित केलेल्या जागेतच व्यवसाय करावा. विहित क्षेत्रफळांपेक्षा अधिक जागा त्यांनी अतिक्रमित करू नये. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करावी. विहित क्षेत्रफळात व्यवसाय करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी शहर भागातील काही पाहणीच्या वेळी दिले.


पदपथ अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी सोमवारी सकाळी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ मुंबई शहर विभागात ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मुंबई सेंट्रल,ग्रँटरोड, मरीन लाईन्स, क्रॉफर्ड मार्केट आदी परिसरात त्यांनी पाहणी केली. उपायुक्त (परिमंडळ- १) चंदा जाधव , उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (डी विभाग) योगेश साळुंके, सहायक आयुक्त (ई विभाग) आनंद कंकाळ, सहायक आयुक्त (बी विभाग) जितेंद्र घोराडे, सहायक आयुक्त (ए विभाग) उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त (सी विभाग) सुनील माने आदी यावेळी उपस्थित होते. (Ashwini Bhide)



‘डी’,विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, शंकरशेट मार्ग (भाजी गल्ली), ताडदेव मार्ग; ‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग, संत सावता मार्ग; ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट, काझी सय्यद मार्ग; ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स, चंदनवाडी परिसर; ‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), महापालिका मार्ग आदी परिसरातील पदपथांची स्थिती आणि दुरुस्ती आदी बाबींची पाहणी केली. ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसरांना भेटी देत त्याठिकाणी पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच, पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांच्या परवान्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. (Ashwini Bhide)


पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना निश्चित केलेल्या जागेतच व्यवसाय करावा. विहित क्षेत्रफळांपेक्षा अधिक जागा त्यांनी अतिक्रमित करू नये. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करावी. विहित क्षेत्रफळात व्यवसाय करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश आश्विनी भिडे यांनी यावेळी दिले. पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. (Ashwini Bhide)



दरम्यान,‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोडस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग चौकी, संत सावता मार्गावरील उदचंन केंद्र येथे त्यांनी भेटी दिल्या. तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points-GVPs) आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पाहणी केली.


याठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना योग्य करावी आणि वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित कचऱ्याच्या थैलीवर दर्शनी भागावर नोंदवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने मुंबईत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आश्विनी भिडे समाधान व्यक्त केले. तरीही, संबंधित विभागाने अधिक प्रभावीपणे उपाययोजना करून पादचाऱ्यांना पदपथांवरील बदल दृश्य (Visible) स्वरूपात जाणवतील, हे सुनिश्चित करावे, असेही आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यावेळी म्हणाल्या.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईतील 'एसआयआर' मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत तफावत

- किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विशेष संक्षिप्त

Science Centre Metro Station : सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग

टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या

Kandivali Fire : कांदिवलीत हॉटेलजवळ आग; 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. कांदिवली स्टेशन रोडवरील अभिराई

BMC : मुंबई महापालिकेचे नगरसेवक आता हायटेक

विविध समित्यांचे अजेंडा आता त्यांच्या मोबाईलवर प्रस्तावांच्या छपाईसह वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च

BMC Security : मुंबई महापालिका मुख्यालयाची नजर आता अधिक तीक्ष्ण

एआय आधारीत बसवले जाणार ८७ सीसी टिव्ही कॅमेरे मुंबई (सचिन धानजी)  : मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या

Ganeshotsav 2026 : मूर्ती विसर्जनासाठी समुद्रातील भरतीची भीती नसेल गणेश भाविकांना

महापालिकेच्यावतीने समुद्रात २१ विसर्जन ठिकाणी बसवणार ओहोटी रेषा दर्शवणारी मार्गदर्शक तरंगचिन्हे मुंबई (सचिन