नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. हा स्टील प्लांट भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या ArcelorMittal कंपनीचा आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एकूण १४ कर्मचारी जखमी झाले आहेत. (Laxmi Mittal Ukraine Steel Plant)
हा प्लांट युक्रेनमधील क्रिव्ही रीह शहरात आहे. हे शहर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे जन्मगाव आहे. आर्सेलरमित्तलचा क्रिव्ही रीह प्लांट हा युक्रेनमधील सर्वात मोठ्या एकात्मिक स्टील उत्पादन केंद्रांपैकी एक आहे.
प्लांटच्या वीज यंत्रणेला मोठे नुकसान :
रशियाच्या हल्ल्यात प्लांटच्या वीजपुरवठा व्यवस्थेसह स्टील उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लास्ट फर्नेस युनिटचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनाचा काही भाग तात्पुरता थांबवावा लागला. युक्रेनने रशियावर केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्याच्या प्रत्युत्तरात रशियाने हा हल्ला केल्याचे वृत्त आहे. (Laxmi Mittal Ukraine Steel Plant)
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. यूएस जिओलॉजिकल ...
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला :
याआधी युक्रेनने रशियाच्या अनेक भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रात्रीच्या कारवाईत देशभरातील ८२२ युक्रेनी ड्रोन निष्प्रभ करण्यात आले.
या हल्ल्यांमध्ये रशियात किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मॉस्को परिसराचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव्ह यांनी हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक असल्याचे म्हटले. मॉस्को परिसरात एका ड्रोनचा एका खासगी घरावर पडल्याने ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच रशियातील मोठ्या ऑनलाइन रिटेल कंपनीच्या गोदामालाही आग लागल्याची माहिती आहे. (Laxmi Mittal Ukraine Steel Plant)
मॉस्कोकडे आले शेकडो ड्रोन :
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या म्हणण्यानुसार, मॉस्कोच्या दिशेने येणारे सुमारे ६०० ड्रोन आढळून आले. यातील जवळपास एक तृतीयांश ड्रोन मॉस्को परिसरातच नष्ट करण्यात आले. रशियाच्या रोस्तोव्ह भागातील तीन शहरांवरही ड्रोन हल्ला करण्यात आला. स्थानिक प्रशासनानुसार, या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. १५० हून अधिक ड्रोनच्या हल्ल्यामुळे अनेक घरांचे आणि एका रेल्वे स्थानकाचे नुकसान झाले. (Laxmi Mittal Ukraine Steel Plant)
पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचा राग मनात ठेवून काही ...
झेलेन्स्कींची पुन्हा एअर डिफेन्सची मागणी :
रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील क्रिव्ही रीहसह झापोरिझ्झिया, सुमी आणि डोनेत्स्क भागांनाही लक्ष्य करण्यात आले. राजधानी कीव्हमध्ये अनेक ठिकाणी आग लागली असून सहा जण जखमी झाले. पोचाइना मेट्रो स्थानकाजवळील मोठ्या पुस्तक बाजारालाही आगीचा फटका बसला. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रशियावर नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधील शहरांवर १,५५० हून अधिक ड्रोन, सुमारे १,५६० मार्गदर्शित बॉम्ब आणि ६२ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. (Laxmi Mittal Ukraine Steel Plant)
दरम्यान, झेलेन्स्की यांनी मित्रदेशांकडे आणखी एअर डिफेन्स सिस्टम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.