Tarapith Hotel Fire : तारापीठ येथील हॉटेलला पहाटे भीषण आग; 6 पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

पश्चिम बंगाल :  पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रसिद्ध तारापीठ येथे सोमवारी सकाळी एका खासगी हॉटेलला भीषण आग लागली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये राहणाऱ्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. आगीमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. (West Bengal)

मिळालेल्या माहितीनुसार, तारापीठमधील ‘बिदिशिनी’ हॉटेलच्या तळमजल्यावर सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. हॉटेल तलावाजवळ आणि तारापीठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील पाहुण्यांमध्ये घबराट पसरली. (Hotel Fire)



घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत गंभीररित्या भाजल्यामुळे 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. (Fire Incident)

आगीच्या घटनेत जखमी झालेल्या अनेकांना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तारापीठ आणि रामपूरहाट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. आगीमागचे नेमके कारण शोधण्यासाठीही तपास केला जात आहे. (Tarapith Hoptel)

अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हॉटेलमधील विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे तारापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Fire)

 
Comments
Add Comment

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायमूर्ती पुन्हा चर्चेत; आतापर्यंत 35 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश देणारे उत्तर प्रदेशातील न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर

Fire at a hotel in Birbhum : तारापीठ मंदिर परिसरात भयंकर आग! साखरझोपेत ७ भाविकांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू!

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथे एका हॉटेलला पहाटेच्या

Ashokdham Temple : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

बिहार : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली.

UGC NET 2026 : UGC-NET जून 2026 ची 3 विषयांची परीक्षा पुन्हा होणार; NTA ने जाहीर केलं वेळापत्रक

मुंबई :  UGC-NET जून 2026 सत्रातील परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA)

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित