Devendra Fadnavis Meets PM Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

महाराष्ट्रातील विविध विकासप्रकल्पांवर नवी दिल्लीत सविस्तर चर्चा


नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विकासप्रकल्प आणि केंद्र सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या योजनांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख विकासकामांची सद्यस्थिती आणि प्रगती याबाबत पंतप्रधान मोदी यांना सविस्तर माहिती दिली. तसेच, केंद्र सरकारच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी आणि अधिक सहकार्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला.





पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्लीत भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा केली. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी ठरली आहे." महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी यांचे नेहमीच बहुमूल्य मार्गदर्शन लाभते. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा आणि सहकार्य मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. केंद्राच्या सहकार्याने राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अधिक गती मिळणार असल्याचे या भेटीवरून स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Ujjain Mahakal Stampede : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; नागचंद्रेश्वर दर्शनादरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती, १३ जण जखमी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या

Laxmi Mittal Ukraine Steel Plant : लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा मिसाईल हल्ला; २ जणांचा मृत्यू, १४ कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायमूर्ती पुन्हा चर्चेत; आतापर्यंत 35 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश देणारे उत्तर प्रदेशातील न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर

Fire at a hotel in Birbhum : तारापीठ मंदिर परिसरात भयंकर आग! साखरझोपेत ७ भाविकांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू!

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथे एका हॉटेलला पहाटेच्या

Tarapith Hotel Fire : तारापीठ येथील हॉटेलला पहाटे भीषण आग; 6 पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

पश्चिम बंगाल :  पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रसिद्ध तारापीठ येथे सोमवारी सकाळी एका खासगी हॉटेलला भीषण

Ashokdham Temple : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

बिहार : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली.