Sonia Gandhi : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल

कर्नाटक : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील मंगळूर येथील उर्वा पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांकडून सोनिया गांधी यांच्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गायले जात असताना ते दोन कडव्यांनंतर थांबवण्याचे निर्देश दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. (Sonia Gandhi)



भाजप नेत्यांकडून कायदेशीर कारवाईची मागणी :


भाजप नेते विकास पुत्तूर यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, १५ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम’ सुरू असताना सोनिया गांधी यांनी कार्यक्रमात हस्तक्षेप केला आणि ते थांबवण्यास सांगितले. पुत्तूर यांनी या कृतीवर आक्षेप घेत, याप्रकरणी एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय गीताचा किंवा राष्ट्रीय सन्मानाचा अवमान झाल्यास संबंधित व्यक्तीचे पद किंवा राजकीय स्थान न पाहता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असा दावा त्यांनी केला. (Sonia Gandhi)



‘कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार’ :


तक्रारीवर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, तर कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा विकास पुत्तूर यांनी दिला आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी तक्रारीतील आरोपांची दखल घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. (Sonia Gandhi)



नेमकं प्रकरण काय?


१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘वंदे मातरम’चे गायन करण्यात आले. भाजपच्या आरोपानुसार, गीताची दोन कडवी झाल्यानंतर ते थांबवण्यात आले. कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने या घटनेला ‘वंदे मातरम’चा अपमान असल्याचे म्हटले आहे. मात्र, या आरोपांबाबत काँग्रेसकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sonia Gandhi)


Comments
Add Comment

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे