IBPS PO Prelims Admit Card 2026 जारी; २२ आणि २३ ऑगस्टला होणार परीक्षा, असे करा कार्ड डाउनलोड

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून Probationary Officer/Management Trainee (CRP PO/MT-XVI) भरती प्रक्रियेच्या प्राथमिक परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहे. IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवार आपले Admit Card डाउनलोड करू शकतात. (IBPS PO Prelims Admit Card 2026)



२२ आणि २३ ऑगस्टला होणार परीक्षा :


IBPS PO Prelims परीक्षा २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. IBPS च्या २०२६-२७ अधिकृत परीक्षेच्या वेळापत्रकानुसार या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्राथमिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, उमेदवारांच्या Admit Card वर परीक्षा केंद्र, तारीख आणि शिफ्टची अचूक माहिती दिली असेल. (IBPS PO Prelims Admit Card 2026)



IBPS PO Admit Card असे करा डाउनलोड :


- IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- CRP PO/MT संबंधित विभागात जा.
- CRP PO/MT-XVI भरती प्रक्रियेची लिंक निवडा.
- Preliminary Examination Call Letter या लिंकवर क्लिक करा.
- आपला Registration Number/Roll Number आणि Password/Date of Birth भरा.
- कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- Admit Card डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा. (IBPS PO Prelims Admit Card 2026)


IBPS च्या सूचनेनुसार उमेदवारांनी Call Letter वर दिलेल्या परीक्षा केंद्र, तारीख आणि वेळेची माहिती काळजीपूर्वक तपासावी.



परीक्षेची वेळ किती?


IBPS PO Prelims परीक्षेचा पेपर ६० मिनिटांचा असतो. उमेदवाराची नेमकी शिफ्ट आणि रिपोर्टिंग टाइम Admit Card वर नमूद केलेला असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग टाइमपूर्वी पोहोचणे महत्त्वाचे आहे. (IBPS PO Prelims Admit Card 2026)



परीक्षा केंद्रावर काय घेऊन जावे?


उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर Admit Card ची प्रिंट कॉपी आणि वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. (IBPS PO Prelims Admit Card 2026)

Comments
Add Comment

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी

Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना केला आहे; मात्र येणाऱ्या

Zeeshan Siddique : झीशान सिद्दीकींना पोर्तुगाल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी; वांद्रे पोलिसांत NC दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पोर्तुगालमधील एका क्रमांकावरून व्हॉइस नोट

Worli Century Land : वरळीतील सेंच्युरीची जागा पेडर रियल्टी कंपनीकडे भाडेतत्वावर; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

- महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार १,३५१ कोटी रुपये - स्थानिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार, अध्यक्षांनी दिली

BMC NEWS : पदपथ अतिक्रमण मुक्त मोहिमेला अडथळा; जेसीबी अभावी विभागातील कारवाई थंडावली

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर