Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात (Flag Hosting) आले. मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परेडची पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी म्हसरूळ येथे एमएनजीएलच्या कामादरम्यान लागलेली आग कोणतीही जीवितहानी न होता आटोक्यात आणणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सायकलप्रेमींनी महापालिका परिसरातून (NMC Area) रॅली काढली. या रॅलीला महापौरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. तसेच ‘हर घर सेल्फी’ उपक्रमांतर्गत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांनी तिरंग्यासोबत सेल्फी काढत नागरिकांनीही हा उपक्रम घराघरात राबविण्याचे आवाहन केले.
Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत ...
यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करून तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, नगररचना अधिकारी सचिन जाधव, अग्निशमन दलप्रमुख संजय बैरागी यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय (District Collector's Office) येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.