भारत यंदा 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत हा दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जातो. ‘विविधतेतील एकता’ ही भारताची ओळख जपत देशाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रेरणा स्वातंत्र्यदिनातून मिळते. (Happy Independence Day)
या खास दिवशी तुम्हीही आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक देशभक्तीच्या शुभेच्छा देऊन स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित करू शकता. WhatsApp Status, Facebook पोस्ट किंवा Instagram Storyसाठी वापरता येतील असे काही खास शुभेच्छा:
वडूज, ता. खटाव : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र ...
जात, धर्म, भाषा वेगळी असली तरी देश एक आहे… हीच भारताची खरी ताकद! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत माझा देश आहे, आणि भारतीय असणे हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

देशाचा मान, देशाचा अभिमान,
तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान!
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक भारत, श्रेष्ठ भारत!
विविधतेत एकता हेच आपल्या देशाचे खरे सामर्थ्य आहे.
सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
