Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक जिल्ह्यातील वीर सैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी वीर प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वीर जवानांना आदरांजली वाहत, त्यांच्या त्यागाचे स्मरण कायमस्वरूपी राहावे, या हेतूने हे प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात नाशिक जिल्हा सैनिक कल्याण विभागांतर्गत वीर नारी श्रीमती उषा संतोष डामसे आणि श्रीमती नीता सदाशिव म्हसकर यांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. वीर सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर झालेल्या या उपक्रमामुळे शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत, नव्या पिढीसमोर देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी म्हटले आहेत.


त्यासोबतच यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नाशिक विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, जिल्हा जलसंधारण आदी विविध कार्यालयातील विविध स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात आले.


पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम व संजय वायचळे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर उपायुक्त भगीरथ देशमुख यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अती उत्कृष सेवा पदक आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय, १०० मी. धावणे परा ॲथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप महादू गावित याचा सत्कार त्यांनी केला.

Comments
Add Comment

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Happy Independence Day : मित्र-मैत्रिणींना पाठवा देशभक्तीने भरलेल्या खास शुभेच्छा; WhatsApp Status, Facebook Messagesसाठी परफेक्ट

भारत यंदा 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Mantralaya : मंत्रालयातील कॅन्टीनचा 'लूक' बदलणार

- ३ कोटींचा निधी मंजूर; खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासोबत स्वच्छतेवर भर देणार मुंबई : राज्याचे प्रशासकीय

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वडूज येथे भव्य तिरंगा रॅली

वडूज, ता. खटाव : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून,