Nashik : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना अमोर आली आहे. माणसाच्या रूपात कसा रानटी प्राणी असू शकतो याचा प्रत्यय जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यातील या घटनेमुळे उघडकीस आला आहे. देवळा तालुक्यातील लोहोणेर (Lohoner) या गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक अशी घटना समोर आली आहे. चिकनमध्ये विषारी पदार्थ टाकून २१ भटके कुत्रे आणि दोन मांजरे यांना खाऊ घालून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोहोणेर येथे १३ ऑगस्ट रोजी सकाळी २१ भटके कुत्रे आणि दोन मांजरी मृत्युमुखी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना मिळाली. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने कुत्रे मेल्याने हे सर्व त्यांना संशयास्पद वाटले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते आणि सहायक पोलीस निरीक्षक विनय देवरे यांनी तत्काळ लोहोणेर येथे भेट दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पोर्तुगालमधील एका क्रमांकावरून व्हॉइस नोट पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ...
२१ कुत्रे आणि दोन मांजरीचा मृत्यु
लोहोणेरमधील बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या तरुणाने सांगितल्यानुसार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी लोहोनेर येथीलच रहिवासी असलेल्या रमेश अहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी यांनी चिकन (मांस) मध्ये विषारी द्रव मिसळून ते गावातील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरीना खाऊ घातले. त्यामुळे गावातील २१ कुत्रे आणि दोन मांजरी मृत्युमुखी पडल्या. सकाळी लोहोणेर ग्रामपालिकेचा सफाई कर्मचारी कांतीलाल साळुंखे यांच्या निदर्शनास हा खळबळजनक प्रकार आला. त्यांनी सदर सर्व मृत प्राण्यांना जेसीबीच्या साहाय्याने अमरधाममागे खड्डा करून जमिनीत पुरले. आणि तसे कळवले.
देवळा पोलिसात फिर्याद दाखल
दरम्यान पोलीस अधिकारी तपासासाठी जात असताना बालाजी मंदिराजवळ एक कुत्रा तडफडत असल्याचे तसेच तोंडातून फेस येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. थोड्याच वेळात कुत्र्याचा मृत्यू झाल्याने सदर मृत कुत्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी तो देवळा पशुवैद्यकीय दवाखान्यात नेला. त्याठिकाणी शवविच्छेदन करुन त्याचे नमुने घेतले. या सर्व घडामोडी लक्षात घेता पोलीस शिपाई सुरेश रमेश कोरडे यांनी याबाबत देवळा पोलिसात (Deola Police Station) फिर्याद दाखल केली.
Nashik : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ( Simhastha Kumbh Mela ) कामांच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर ...
चिकनमध्ये विष टाकून प्राण्यांची हत्या
या फिर्यादीनुसार रमेश अहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांनी संगनमत करून गावातील २१ भटके कुत्रे आणि दोन मांजरी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जाणूनबुजून अत्यंत क्रूरतेने चिकनमध्ये विषारी पदार्थ कालवून ते खाऊ घातल्याने २१ कुत्रे आणि दोन मांजरी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युला कारणीभूत झाले म्हणून या दोघांविरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने छळ प्रतिबंधक कायद्यानुसार देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते करीत आहेत. दरम्यान अशा प्रकारे पशुहत्या झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.