Nashik : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ( Simhastha Kumbh Mela ) कामांच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बनावट आदेशांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बनावट कागदपत्रे व बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून तीन कोटी पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) अटकसत्र सुरू आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील जामनेर (Jamner) येथून आणखी चार जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
Nashik : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची अचानक पाहणी करत कार्यालयीन उपस्थितीचा आढावा ...
नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांची कामे सुरु आहेत. कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (Fake Work Order) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारी साखळी उघड झाली. कुठलीही निविदा नसताना संशयितांनी ५९१ कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश देत तक्रारदाराची तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तीन गुन्हे दाखल आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आगामी काळातील भारताच्या ...
'हे' संशयित आरोपी ताब्यात
नाशिक पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून तनय महाजन (३२) आणि नरेंद्र महाजन (५१) यांना अटक केली होती. त्यानंतर शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख (३६, रा. गणेशवाडी रोड, मदनीनगर, जामनेर), अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख (४३, रा. जुना बोदवड रोड, चाळीस मोहल्ला, जामनेर), शकील अहमद सलीमुद्दीन शेख (४२, रा. प्लॉट नं. १३, मदने नगर, जामनेर) आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफ्फार (४२, रा. इस्लामपुरा, जामनेर, जळगाव) यांना वेगवेगळ्या दिवशी अटक करण्यात आली.
न्यायालयाने तनय महाजन, नरेंद्र महाजन, शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख आणि अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. तर उर्वरित शकील शेख आणि मोहम्मद गफ्फार या दोघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.