Nashik : 9 कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई, जि.प.सीईओंची सरप्राईज व्हिजीट

Nashik : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची अचानक पाहणी करत कार्यालयीन उपस्थितीचा आढावा घेतला. हजेरी नोंदविलेली नसलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांना दिले.



जि.प.सीईओंची सरप्राईज व्हिजीट


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी बुधवारी जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागास अचानक भेट देऊन विभागीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, दैनंदिन कामकाज तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान ९ कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन उपस्थितीची हजेरी नोंदविलेली नसल्याचे निदर्शनास आले. कार्यालयीन शिस्त व वेळेचे पालन याबाबत पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत संबंधित ९ कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांना दिले. शासकीय कार्यालयातील उपस्थिती व वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.



शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांचा आढावा


यानंतर पवार यांनी जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा इमारतींची सुरक्षितता, वर्गखोल्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती व प्रस्तावित बांधकामांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घेऊन धोकादायक इमारती किंवा वर्गखोल्यांमध्ये तातडीने कार्यवाही करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी आणि आवश्यकतेनुसार कामांना प्राधान्यक्रम द्यावा, असेही पवार यांनी स्पष्ट केले.



सकाळी आढावा, संध्याकाळी पदोन्नती


शिक्षण विभागातील प्रतीक्षायादीतील ८ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बुधवारी सकाळी दिल्या. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून बुधवारी सायंकाळी या ८ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिली. त्याच दिवशी पदोन्नती झाल्याने संबंधित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Comments
Add Comment

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या