Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय (District Collector's Office) येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Nashik : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिली जाणारी मानाची केंद्रीय अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदके २०२६ जाहीर झाली आहेत. यामध्ये नाशिक ...
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डाॅ. जयकुमार आडे, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सीमा अहिरे, शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, रवींद्र भारदे जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, तहसिलदार पंकज पवार, प्रदीप कर्पे, अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या नूतनीकरण दालनाचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
- सुप्रिया सुळे यांचे संकेत; सलग दोन दिवस बैठकांचे सत्र मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात राज्य पातळीवर लवकरच मोठे फेरबदल होणार असून, ...
तर भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन (Independency Day) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर हिमगौरी आहेर-आडके (Mayor Himgauri Aher-Adke) यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात (Flag Hosting) आले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.