Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मुलीच्या जन्मानंतर तिच्या शरीरात झालेल्या बदलांवरूनही अनेकांनी स्वराला लक्ष्य केले. आता अभिनेत्रीने एका पॉडकास्टमध्ये या ट्रोलिंगवर खुलेपणाने भाष्य करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.


जय मदन यांच्या पॉडकास्टमध्ये स्वरा भास्करने लग्न, मातृत्व आणि बॉडी-शेमिंगसह विविध विषयांवर चर्चा केली. आपल्या दिसण्यावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तिचं आयुष्य इतरांना खूश करण्यासाठी नाही. एखाद्याला ती आवडत नसेल तर तिचं सोशल मीडिया पेज पाहण्याची गरज नाही, असेही तिने सुनावले.



स्वराने सांगितले की, मुलाच्या जन्मानंतर महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. तिच्या म्हणण्यानुसार, मनोरंजन क्षेत्रात कायम तरुण आणि आकर्षक दिसण्याचा दबाव असतो. यासाठी बोटॉक्स, इंजेक्शन आणि प्लास्टिक सर्जरीसारख्या गोष्टींचाही वापर केला जातो. मात्र, वय वाढणे, शरीरात बदल होणे आणि आयुष्यात वेगवेगळे टप्पे येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे तिने म्हटले. ( Swara Bhasker Statement)


फहादसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त असताना मेकअप न केलेला तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर काही जणांनी तिच्या जुन्या आणि नव्या फोटोची तुलना करत आंतरधर्मीय विवाहावरूनही टीका केली. लग्नानंतर ती जाड आणि कुरूप झाल्याचे काही कमेंट्स करण्यात आल्याचे स्वराने सांगितले. या ट्रोलिंगमुळे फहादलाही चिंता वाटत होती, असे तिने नमूद केले.


स्वराने पुढे सांगितले की, महिलांवर त्यांच्या दिसण्याबाबत समाजाकडून मोठा दबाव असतो. विशेषतः बाळंतपणानंतर महिलांना वजन कमी करण्याची चिंता सतावत असते. मात्र, या काळात शरीराला विश्रांती आणि योग्य पोषणाची गरज असते. कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य माहितीमुळे आपण या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो, असेही तिने सांगितले.


स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 16 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत कोर्ट मॅरेज केले. सप्टेंबर 2023 मध्ये या दाम्पत्याला राबिया नावाची मुलगी झाली. ( Celebrity News)

Comments
Add Comment

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने