Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय राहिला आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन गेली अनेक वर्ष हा शो होस्ट करत आहेत. या कार्यक्रमाला हिंदी भाषेत प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे हिंदीतील लोकप्रियतेनंतर हा शो मराठी भाषेतही आला. मराठीतील 'कोण होणार करोडपती' या नावाने प्रदर्शित झालेला कार्यक्रम अभिनेते 'सचिन खेडेकर' यांनी होस्ट केला होता. (Madhuri Dixit)



आता पुन्हा 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हे पर्व होस्ट करणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या नव्या सीझनचा नवा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. 'कौन बनेगा करोडपती' दरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन किती मानधन घेतात हा सर्वांसाठीच चर्चेचा मुद्दा होता. पण आता माधुरी मराठी करोडपतीसाठी किती मानधन घेणार असाही प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. त्यामुळे आता माधुरीच्याही मानधनाबाबत तशीच चर्चा रंगतेय. (Madhuri Dixit)


माधुरी दीक्षितने याआधी २००२ साली 'कहीं ना कहीं कोई है' हा शो होस्ट केला होता. त्यानंतर आता ती तब्बल २४ वर्षांनी कोण होणार करोडपती होस्ट करताना दिसणार आहे. अद्याप माधुरीच्या मानधनाबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार माधुरी दीक्षित एका रिअॅलिटी शोच्या संपूर्ण सीझनसाठी तब्बल २४ ते २५ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे 'केबीसी मराठी'च्या आठव्या सीझनसाठीही ती जवळपास इतकीच रक्कम आकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही रक्कम अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.

Comments
Add Comment

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल