Friday, August 14, 2026

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेच्या १०० लाभार्थ्यांना 'विशेष अतिथी' म्हणून आमंत्रित केले आहे. लाभार्थी आपल्या जोडीदार किंवा सहकाऱ्याबरोबर या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होतील. विशेष अतिथींमध्ये विविध पारंपरिक व्यवसायांमधील महिला कारागिरांचाही समावेश असून, यामधून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, उपजीविकेत अधिक सहभाग आणि भारताचा समृद्ध कलात्मक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यात महिलांची भूमिका बळकट करण्याच्या दिशेने या योजनेचे योगदान प्रतिबिंबित होते.

लाभार्थींची ओळख आणि प्रशंसा

पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना त्यांच्या सहभागाचा एक भाग म्हणून, ओळख आणि प्रशंसेचे प्रतीक म्हणून स्मृतिचिन्हे देखील प्रदान केली जातील. भारताच्या पारंपरिक हस्तकला आणि सांस्कृतिक वारशातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी १४ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन येथे एमएसएमई मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांना संवाद साधता येईल.

पीएम विश्वकर्मा योजना

पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक आहे. पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आणि हस्तकलाकारांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. कारागिरांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण करणे, पारंपरिक हस्तकला बळकट करणे आणि शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, ही योजना कौशल्यवृद्धी, आधुनिक साधने, आर्थिक सहाय्य, डिजिटल सक्षमीकरण आणि बाजारपेठेशी जोडणी याद्वारे सहाय्य पुरवते. या योजनेंतर्गत ३० लाख पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांची नोंदणी करण्यात आली आहे.

भारताच्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांच्या योगदानाचा गौरव

आमंत्रित लाभार्थी हे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या १८ पारंपरिक व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये शिंपी, सुतार, सोनार, लोहार, कुलूपवाला इत्यादींचा समावेश आहे. आमंत्रित लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत नोंदणी, मूलभूत कौशल्य प्रशिक्षण आणि अवजारांची तरतूद यासह या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले इतर सहाय्याचा लाभ घेतला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांचा सहभाग हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामध्ये पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव आहे. लाल किल्ल्यावरील त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांना ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची आणि या ऐतिहासिक राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा