नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवा दलाच्या एकूण १०५७ जणांना पदके जाहीर झाली आहेत. काहींना शौर्य पदके तर अनेकांना सेवा पदके जाहीर झाली आहेत.
चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ...
शौर्य पदक (जीएम) हे जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करताना, किंवा गुन्हा रोखताना किंवा गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेले उल्लेखनीय धैर्य, यासाठी प्रदान केले जाते. यंदा एकूण ३०१ शौर्य पदके (जीएम) जाहीर झाली आहेत. यात २७२ पोलिसांना आणि २९ अग्निशमन दलाच्या जवानांना जाहीर झाली आहेत. यंदाच्या ३०१ शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक, १९७ नक्षलग्रस्त भागातील जवानांना, तर जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील ५१ जवान, ईशान्येकडील राज्यांमधील १२ आणि इतर भागातील ४१ जवानांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रदान केले जात आहेत.
जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी, पंतप्रधान ...
राष्ट्रपतींचे अती विशिष्ट सेवा पदक (पीएसएम) हे सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते, आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदक (एमएसएम) हे साधनसंपन्नता आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते. यंदा एकूण ९२ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (पीएसएम) जाहीर झाली असून यात पोलीस सेवेतील ८३, अग्निशमन सेवेतील चार, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील तीन आणि सुधारात्मक सेवेतील दोन जणांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एकूण ६६४ पदके (एमएसएम) जाहीर झाली असून यातील ६०६ पोलीस सेवेसाठी, २८ अग्निशमन सेवेसाठी, १८ नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेसाठी आणि १२ सुधारात्मक सेवेसाठी आहेत.
· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान नवी दिल्ली : भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात ...
सूची-I पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सूची- II पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सूची- III पाहण्यासाठी येथे क्लिक करा





