लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (NCS) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. (Ladakh Earthquake)
- मुंबई महापालिकेला येथील रहिवाशांना बाहेर काढायचा अधिकार काय? - जिल्हाधिकारी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले, महापालिका होते बदनाम मुंबई (सचिन ...
भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे?
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने आपल्या ‘X’ हँडलवर लेहमधील भूकंपाची माहिती दिली आहे. त्यानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू ३६.८८१ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.४०२ अंश पूर्व रेखांश येथे असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाची खोली कमी असल्याने त्याचे हादरे परिसरात तुलनेने तीव्रतेने जाणवले असण्याची शक्यता आहे. (Ladakh Earthquake)
पहाटेच्या वेळी हादरे, झोपेतून नागरिक जागे :
गुरुवारी पहाटे नागरिक झोपेत असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने आणि जमीन हादरल्याचे जाणवल्याने अनेक नागरिक घाबरले. काही जणांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. भूकंपानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (Ladakh Earthquake)
५.५ तीव्रतेचा भूकंप किती धोकादायक?
भूकंपाची तीव्रता वाढत गेली की त्याची विध्वंसक क्षमता वाढते. २.० किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सामान्यतः सूक्ष्म भूकंप मानले जातात आणि त्यांचे हादरे अनेकदा जाणवतही नाहीत. तर ४.५ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप गांभीर्याने घेतले जातात. अशा भूकंपांमुळे परिस्थितीनुसार इमारती, घरांचे बांधकाम आणि कमकुवत संरचनांना नुकसान होण्याची शक्यता असते. ७.० किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप अत्यंत धोकादायक ठरू शकतात. (Ladakh Earthquake)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही भूकंप :
देशातील विविध भागांमध्ये अलीकडच्या काळात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात रात्री भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंदवण्यात आली होती. NCSच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये रात्री सुमारे १० वाजून ५९ मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली होती. त्याचा केंद्रबिंदू २०.४२४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ अंश पूर्व रेखांश येथे होता. भूकंपाची खोली सुमारे ५ किलोमीटर असल्याचे नोंदवण्यात आले होते. केंद्रबिंदू नाशिक जिल्ह्यात असल्याने आसपासच्या काही भागांमध्येही हादरे जाणवले होते. (Ladakh Earthquake)
EQ of M: 5.5, On: 13/08/2026 06:05:15 IST, Lat: 36.881 N, Long: 74.402 E, Depth: 10 Km, Location: Leh, Ladakh.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/PWjNXlhVk0
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) August 13, 2026
दिल्ली-NCRमध्येही जाणवले होते भूकंपाचे हादरे :
यापूर्वी २ ऑगस्ट रोजी दिल्ली-NCRमध्ये पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता २.९ इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतील उत्तर जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले होते.
या भूकंपामुळे कोणतीही मोठी हानी झाल्याची माहिती समोर आली नव्हती. मात्र, देशाच्या विविध भागांमध्ये वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि भूकंपाच्या वेळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Ladakh Earthquake)