Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मृतांचा आकडा ८ वर पोहोचला असून एकूण ७ जण जखमी आहेत. राजावाडी रुग्णालयाचे AMO डॉ. हनुमंत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम वझीर अली खान (वय 28 वर्षे) यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना ‘Brought dead’ म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. यामुळे कालपर्यंत समोर आलेल्या ७ मृतांच्या संख्येत आणखी एका मृताची भर पडली असून, एकूण मृतांचा आकडा ८ झाला आहे.



७ जणांवर उपचार सुरू


ताज्या माहितीनुसार, या घटनेत एकूण ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर संबंधित रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. काल मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील भाभा रुग्णालयात सोहेल अन्सारी (18), मोहम्मद अन्सारी (14), नईमुद्दीन इक्बाल खान (28) आणि साजिद अन्सारी (16) असे चार जखमी दाखल होते. सोहेल अन्सारी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, तर इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली होती. राजावाडी रुग्णालयातही तीन जखमींवर उपचार सुरू होते. त्यामध्ये फराना दिलबर खान (28), दिलबर अमनुल्ला खान (38) आणि शमीन मुस्लिम खान (26) यांचा समावेश होता.



मृतांची संख्या ८


कालच्या प्राथमिक माहितीनुसार राजावाडी रुग्णालयात ७ जणांना मृत घोषित करण्यात आले होते. आता सद्दाम वझीर अली खान (28) यांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा ८ झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून मृत आणि जखमींच्या संख्येबाबत पुढील अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. तपास आणि वैद्यकीय प्रक्रियेनुसार आकडेवारीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.


ताजे अपडेट : ८ जणांचा मृत्यू | ७ जखमी | १३ ऑगस्ट २०२६, दुपारी १.१५ वाजेपर्यंतची माहिती.

Comments
Add Comment

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ अभियानांतर्गत दहिवडी व वडूज येथे तिरंगा रॅली

दहिवडी / वडूज : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा रॅलीचे

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि