दहिवडी / वडूज : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत नागरिकांनी देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.
राष्ट्रध्वज हा देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश दिला जात आहे. (Har Ghar Tiranga)
मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राष्ट्रपती पदकांसाठी ...
या अभियानात सहभागी होत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
तिरंग्याच्या सन्मानासाठी आणि राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. (Har Ghar Tiranga)
जय हिंद! वंदे मातरम्!