Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला स्वतःच्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचा (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पटेलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Nashik Crime : बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखा ...
१७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
दरम्यान, मतीन पटेलची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा मंगळवारी पोलिसांनी नाशिकरोड न्यायालयात (Nashik Road Court) हजर केले असता न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) वाढ केली. शहर पोलिसांनी टीसीएस प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाकडून याप्रकरणी तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी पटेल यास या गुन्ह्यात संशयित आरोपी केले आहे.
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध ...
दानिशच्या जामिनावरही १७ ऑगस्टला सुनावणी
धर्मांतराचा प्रयत्न तसेच पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी दानिश शेख याच्यावर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. इतर गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला असला तरी या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी त्याच्यावतीने नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरसुद्धा येत्या १७ तारखेला सुनावणी होणार आहे.