Nashik FDA Raid : नाशिकमध्ये सणासुदीच्या तोंडावर 'एफडीए'ची मोठी कारवाई

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत शहरात ३९७.६० किलो संशयास्पद तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुपाचा साठा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


या साठ्याची किंमत तब्बल २ लाख ७५ हजार ८१२ रुपये आहे. ही कारवाई रविवार पेठेतील एका ठिकाणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी (दि. १०) रविवार पेठेतील संजय भागचंद बरूड यांच्या ठिकाणी तपासणी केली. या वेळी अन्न परवाना नसताना विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. (Nashik FDA Raid)



397 किलो संशयास्पद तूप जप्त


तूप कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून 'एफडीए'ने कारवाई करून केएमपी कृष्णा काऊ तूप, माधुली काऊ तूप, श्रीमायी काऊ तूप या तीन ब्रँड्सचा एकूण ३९७.६०० किलो साठा (किंमत रु. २ लाख ७५ हजार ८१२) जप्त केला आहे. याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. (Nashik FDA Raid)



नांदगाव तालुक्यात १९६ लिटर दूध नष्ट


ग्रामीण भागात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत ७ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील दूध विक्रेते चंद्रकांत गरुड यांच्याकडे तपासणी करण्यात आली. तेथे विनानोंदणी व्यवसाय सुरू असल्याचे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात दूध साठवल्याचे आढळले. हे दूध मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने गाईच्या दुधाचे नमुने घेऊन उर्वरित १९६ लिटर दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.

Comments
Add Comment

Nashik TCS Case : मतीन पटेलचा कारागृहातील मुक्काम वाढला

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Nashik Crime : नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक, वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे चौकशीत उघड

Nashik Crime : बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या