CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार, विविध राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च २०२७ पर्यंत दोषारोपपत्रे (चार्जशीट्स) दाखल होतील, ते सर्व खटले कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेतले जाणार आहेत. गृह विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. (CJP)



यापूर्वी शासनाने २१ जुलै २०२६ रोजी काढलेल्या जीआरनुसार, ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटलेच मागे घेण्यास मंजुरी होती. मात्र, न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या लक्षात घेता, ही मुदत वाढवण्याची मागणी होत होती. अखेर शासनाने ही मुदत दीड वर्षांनी वाढवून ३१ मार्च २०२७ पर्यंत केली आहे.


या सुधारित निर्णयामुळे हजारो राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या मोर्चांमधील तरुण आणि विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. त्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात येऊ नये, हा संवेदनशील दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक तरुण, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवरील कायदेशीर तणाव दूर होणार आहे. (Jantar Mantar)

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Nashik Simhastha Kumbh Mela : गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ, कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा' प्रस्ताव

Nashik Simhastha KumbhMela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी वेग घेत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश

Healthy Sweet Dish : सणासुदीला गोड खा, पण वजन वाढण्याची चिंता नको! ‘हे’ हेल्दी स्वीट्स नक्की ट्राय करा

मुंबई : सणासुदीचे दिवस म्हटले की घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. लाडू, बर्फी, श्रीखंड, मोदक अशा पदार्थांवर