Wednesday, August 12, 2026

Gold Rates Update : ऐन सणासुदीत सोनं महागलं! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या १२ ऑगस्टचे ताजे दर

Gold Rates Update : ऐन सणासुदीत सोनं महागलं! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या १२ ऑगस्टचे ताजे दर

मुंबई: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजच्या बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पिवळ्या धातूच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी सराफा बाजारात झालेल्या घडामोडींनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी थेट १,५३,७५० रुपयांवर पोहोचला आहे.

प्रमुख बाजारांमधील सोन्याचे ताजे दर

आजच्या आकडेवारीनुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली असून, बुलियन मार्केटमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तुम्ही आज सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा किंवा सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर देशातील प्रमुख शहरांतील ताजे दर माहिती असणे गरजेचे आहे.

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी खालीलप्रमाणे आहे:

  • मुंबई: १,५३,८५0 रुपये (आर्थिक राजधानीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५४,०२० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत नोंदवला गेला असून, २२ कॅरेटचा भाव १,४१,०९० रुपये इतका आहे.)

  • पुणे: १,५३,८५0 रुपये

  • नाशिक: १,५३,८५0 रुपये

  • नागपूर: १,५३,८५0 रुपये

  • कोल्हापूर: १,५३,850 रुपये

  • जळगाव: १,५३,८५0 रुपये

  • सांगली: १,५३,८५0 रुपये

  • छत्रपती संभाजीनगर: १,५३,८५0 रुपये

तसेच, आयबीजेए (IBJA) नुसार सकाळी जाहीर झालेले विविध कॅरेटनुसार दर खालीलप्रमाणे आहेत:

  • सोने २४ कॅरेट: १५२,८०३ रुपये प्रति १० ग्रॅम

  • सोने २२ कॅरेट: १३९,९६८ रुपये प्रति १० ग्रॅम

  • सोने १८ कॅरेट: ११४,६०२ रुपये प्रति १० ग्रॅम

  • सोने १४ कॅरेट: ८९,३९० रुपये प्रति १० ग्रॅम

सोन्याच्या दरवाढीमागील प्रमुख कारणे

सोन्याच्या किमतीत अचानक झालेली ही वाढ रोखण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी जागतिक बाजारातील घडामोडी कारणीभूत आहेत:

१. अमेरिकन डॉलरमधील नरमी: सोन्याचे भाव वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरमधील नरमी होय. डॉलर कमकुवत झाल्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने स्वस्त ठरते, ज्यामुळे बाजारात सोन्याची मागणी अचानक वाढते.

२. इराण-अमेरिका तणाव आणि कच्च्या तेलाचे दर: कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिका-इराण यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांकडे आकर्षित केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून (Strait of Hormuz) निर्माण झालेल्या स्थितीमुळे जोखीम वाढली आहे.

३. अमेरिकेतील महागाईचे आकडे: सध्या संपूर्ण जागतिक बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर केंद्रित आहे. बुधवारी अमेरिकेचा ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि गुरुवारी उत्पादक मूल्य निर्देशांक (PPI) चे आकडे जाहीर होणार आहेत. या आकडेवारीवरून अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर धोरणाचा अंदाज बांधला जाईल. जर महागाई अपेक्षेपेक्षा कमी राहिली, तर व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आणखी मोठा पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या बाजारात आणखी चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >