वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २० हजार बनावट ५०० रुपयांच्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. शिरसाट फाटा पुलाखाली ही कारवाई करण्यात आली. (Virar Fake Currency)
मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रँचच्या पथकाने संशयावरून एका वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातील एका बॅगेत मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने हा साठा ताब्यात घेतला. (Virar Fake Currency)
Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता पुन्हा फोडण्यात आल्याचा प्रकार ...
१ कोटींच्या नोटा, बाजारात ३० लाखांत विक्रीचा प्लॅन :
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा बाजारात सुमारे ३० लाख रुपयांना विकण्याचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच, बनावट नोटांचा मोठा साठा बाजारात चलनात आणून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. (Virar Fake Currency)
एक संशयित ताब्यात :
या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या बनावट नोटा नेमक्या कुठून आणण्यात आल्या, त्या कोणाकडे पोहोचवण्यात येणार होत्या आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. (Virar Fake Currency)
Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून ...
रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण?
वसई क्राईम ब्रँचकडून आता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. बनावट नोटांचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि बनावट नोटा छापण्यामागे किंवा त्यांची वाहतूक करण्यामागे कोणती टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या या कारवाईमुळे बनावट चलनाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Virar Fake Currency)
View this post on Instagram






