चिकन-मटणाच्या नेहमीच्या पदार्थांऐवजी या हटके रेसिपीजमधून तुमच्या मेजवानीला द्या खास कोकणी-मराठमोळा ट्विस्ट (Gatari Special Food)
कोळंबी मसाला

ताजी कोळंबी, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांची झणझणीत चव… भाकरीसोबत हा पदार्थ गटारीच्या ताटाची रंगत वाढवेल.
चिकन सुक्का

खोबरे, कांदा आणि मसाल्यांमध्ये परतलेलं झणझणीत चिकन सुक्का म्हणजे कोकणी स्टाइल मेजवानीची खासियत.
मटण खिमा

नेहमीच्या मटणापेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर मसालेदार मटण खिमा हा भन्नाट पर्याय आहे. पाव किंवा भाकरीसोबत मस्त लागतो.
सुरमई फ्राय

मसाला लावून कुरकुरीत तळलेली सुरमई गटारीच्या जेवणात स्टार डिश ठरू शकते.
चिकन लिव्हर मसाला

चिकनच्या नेहमीच्या ग्रेव्हीला कंटाळला असाल तर कांदा-मसाल्यात तयार केलेलं चिकन लिव्हर नक्की ट्राय करा.
खेकडा रस्सा

झणझणीत खेकडा रस्सा, गरमागरम भाकरी… गटारीच्या मेजवानीसाठी यापेक्षा भारी कॉम्बिनेशन काय?
पापलेट फ्राय किंवा कालवण

ताज्या पापलेट फ्राय स्टाटर् म्हणून खाऊ शकता. तसेच कालवण सी-फूड प्रेमींसाठी हा परफेक्ट पर्याय आहे.
चिकन 65

कुरकुरीत, मसालेदार आणि चटपटीत चिकन 65 स्टार्टर म्हणून गटारीच्या पार्टीत नक्कीच हिट ठरू शकतो.