Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेली होती. खामगाव परिसरात त्यांची दुचाकी घसरल्याने दोघेही खाली पडले. त्याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी तरुणीच्या मित्राला धमकावून तेथून जाण्यास सांगितले. (Crime News)
बारामती : सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात अनेक तरुण-तरुणी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये येऊन जिद्दीने अभ्यास करतात. मात्र, ...
आणखी तीन मित्रांना कॉल केला अन्....
यानंतर या तिघांनी आणखी तीन जणांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप आहे. सहा जणांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खामगावजवळील एका बंद डाक बंगल्याच्या ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तक्रारीच्या आधारे सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके काम करत आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा पुढील तपास तलासरी पोलीस करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती तलासरीचे पोलीस निरीक्षक अजय गरुड यांनी दिली.
या घटनेमुळे तलासरी परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Palghar)






