Independence Day 2026 : 15 ऑगस्टच्या तयारीला वेग; पंतप्रधान मोदींचे ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असून देशभरात त्याची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा 2026’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश शेअर करत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले. (Har Ghar Tiranga )


पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले. तसेच विकसित भारताचे ध्येय पुढे नेण्यासाठी नागरिकांनी संकल्प घेण्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांनी आपला संदेश पूर्ण केला. (Narendra Modi)





भारत सरकारकडून यंदा ‘हर घर तिरंगा 2026’ अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्टदरम्यान राबवले जात आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवणे आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण करणे हा आहे. या काळात नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यास किंवा सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. (Independence Day)


या अभियानात नागरिक डिजिटल पद्धतीनेही सहभागी होऊ शकतात. तिरंग्यासोबतचा फोटो ऑनलाइन शेअर करून मोहिमेत सहभाग नोंदवता येतो. तसेच तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड केल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Tirnaga Campaign)


दरम्यान, मंगळवारी सकाळी संसद ग्रंथालय भवनात एनडीएच्या साप्ताहिक संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी तिरंगा फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. (15 August)


Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,