Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी रस्त्यालगतच्या पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली. या अपघातात स्कूल व्हॅनमधील इतर काही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. (Sangli School Van Accident)


शिराळा येथील सह्याद्री पब्लिक स्कूलची इंग्रजी माध्यमाची दुसरी शाखा वाघमारेवाडी येथे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शेडगेवाडी येथील युवराज कदम यांची चारचाकी वापरली जाते. सोमवारी सकाळी युवराज कदम गावातील विद्यार्थ्यांना घेऊन आटूगडेवाडी येथील एका विद्यार्थ्याला आणण्यासाठी गेले होते. (Accident)



विद्यार्थ्याला घेऊन परतत असताना आटूगडेवाडी येथे अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर चारचाकी रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या कठड्यावर वेगाने जाऊन आदळली. या भीषण धडकेत चालकाच्या शेजारी बसलेली श्रीशा श्रीनाथ ऊर्फ गणेश इंगळे (वय ५, रा. मेणी) हिचा जागीच मृत्यू झाला. (sangli news)


अपघातात स्कूल व्हॅनमधील इतर विद्यार्थीही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर त्यांना कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले.


या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (School Girls Death)

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि