NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने रविवार ३० ऑगस्ट २०२६ रोजी, कडक सुरक्षा, तांत्रिक सुविधा, मालवाहतूक व्यवस्थापन आणि पुरेशा मनुष्यबळाच्या व्यवस्थेसह देशभरात नीट-पीजी २०२६ परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेची प्रक्रिया नि:पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३३९ शहरांमधील ११११ परीक्षा केंद्रांवर २,७३,०९६ उमेदवारांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला एकूण २,६५,९८० उमेदवार उपस्थित राहिले. यापैकी सुमारे २,६३,५३५ उमेदवारांची परीक्षा निर्विघ्नपणे झाली.



देशभरातील परीक्षेवर प्रत्यक्ष थेट देखरेख आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनावर देखरेख ठेवण्यासाठी एकूण २५२७ प्राध्यापकांची स्वतंत्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, अधिष्ठाते, संचालक, वैद्यकीय अधीक्षक आणि वरिष्ठ प्राध्यापकांसह ७०० हून अधिक जण भरारी पथकांचे सदस्य म्हणून तैनात करण्यात आले होते. समन्वय आणि देखरेख अधिक प्रभावी करण्यासाठी देशभरात एनबीईएमएसची १६ प्रादेशिक नियंत्रण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर थेट सीसीटीव्हीची देखरेख ठेवण्यात आली होती. द्वारका येथील एनबीईएमएसच्या मुख्यालयातील कमांड सेंटरमधून या देखरेखीवर सतत लक्ष ठेवले जात होते. थेट तात्काळ देखरेखीसाठी एनबीईएमएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या १९० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते.



एनबीईएमएसच्या मुख्यालयातील विशेष नियंत्रण केंद्रातून एनबीईएमएस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) आणि टीसीएसच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. परीक्षेची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि तोतयेगिरी रोखण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून, परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचे आधार-आधारित प्रमाणीकरण यशस्वीरीत्या झाले. सरकारी संस्थांनी परीक्षेच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी पूर्ण सहकार्य केले.



देशभरातील बहुतांश उमेदवारांसाठी परीक्षा यशस्वीरीत्या पार झाली असली तरी, iON डिजिटल झोन iDZ सीतापुरा केंद्र, जयपूर, राजस्थान (टीसी क्र. 41682 आणि 41683) येथे एक अनपेक्षित तांत्रिक अडथळा निर्माण झाला. तिथे परीक्षा घेणाऱ्या टीसीएस लिमिटेड या संस्थेच्या परीक्षा केंद्रांमधील अंतर्गत वीज पुरवठ्यातील समस्यांमुळे २४४५ उमेदवारांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. उमेदवारांची अशाप्रकारे परीक्षेदरम्यान गैरसोय झाल्या बद्दल एनबीईएमएसने तीव्र खेद व्यक्त केला आहे. या उमेदवारांना इतरांप्रमाणेच नीट-पीजी २०२६ परीक्षा पुन्हा एकदा आणि निःपक्षपणे देता यावी, यासाठी एनबीईएमएसने तातडीने आवश्यक पावले उचलली आहेत. त्यानुसार, या तांत्रिक अडथळ्या मुळे परीक्षा देता न आलेल्या सर्व उमेदवारांची पुनर्परीक्षा शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जयपूर, राजस्थान येथे घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि इतर आवश्यक सूचना संबंधित उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येतील.

Comments
Add Comment

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक

Chitrakoot Flood : चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीला महापूर; रामघाट परिसर पाण्याखाली, 200 जणांची सुटका

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली