Nashik Crime : पेठ रोडवरील मॅनहोलमध्ये आढळळा कुजलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह,परिसरात खळबळ

Nashik Crime : नाशिकच्या पेठ रोडवरील पिंगळे फार्म आणि सप्तरंग सोसायटी परिसरात रविवारी सकाळी एका मॅनहोलमध्ये अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मॅनहोलमधून मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने तसेच चेहरा विद्रूप झाल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्ती मॅनहोलमध्ये नेमकी कशी पडली? तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ही घटना अपघाती आहे की यामागे अन्य काही कारण आहे? या सर्व बाबींचा तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित


दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत नाशिकचे रस्ते, त्यातील खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात चर्चेच्या स्थानी आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र अशातच आता नाशिक पालिका मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी पुढे आली आहे. नाशिक शहर आणि परिसरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत मृत्यू पावलेल्या सहा नागरिकांच्या वारसांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.


खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत (Potholes Accident) जितेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे, प्रभाकर साहेबराव निकम, उज्वला शांताराम गायकवाड, दिपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर आणि मासुम भिकन शाह यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना (Family) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत (Help) देण्यात आली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे