Nashik : उघड्या वितरण पेट्या, लोंबकळणाऱ्या तारा दिसल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार, महावितरणने सुरु केला विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

Nashik : नाशिकमध्ये वीज वितरण यंत्रणेतील धोकादायक त्रुटींवर आता नागरिकांना थेट तक्रार करता येणार आहे. महावितरणच्या नाशिक मंडळाने (Mahavitaran's Nashik Circle) यासाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ७८७५४४४२३५ सुरू केला आहे. उघड्या वितरण पेट्या, तुटलेली किंवा झाकण नसलेली मिनी पिलर्स, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या, तसेच वाकलेले किंवा धोकादायक अवस्थेतील विद्युत खांब आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर (WhatsApp number) पाठवायची आहे.



फोटो आणि लोकेशन पाठवा


तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा स्पष्ट फोटो आणि अचूक गुगल मॅप लोकेशन पाठवणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित पथकाकडून पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जाणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शहर विभाग-१ मधील १०५, तर शहर विभाग-२ मधील ८० मिनी पिलर्स आणि वितरण पेट्यांना नवीन झाकणे बसवण्यात आली आहेत. नादुरुस्त झाकणांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.



'त्या' तक्रारी स्वीकारणार नाही


मात्र, वीज वितरण यंत्रणेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ७८७५४४४२३५ हा क्रमांक केवळ धोकादायक वीज यंत्रणेबाबत फोटो आणि लोकेशनसह तक्रार करण्यासाठी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी या क्रमांकावर स्वीकारल्या जाणार नाहीत.

Comments
Add Comment

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार

Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध

Chief Minister Devendra Fadnavis : 'सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार'

नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या

CM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं ‘Growth Engine’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना स्टार्टअप आणि

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे