Nashik : विभाजनानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला 'बूस्टर' ! प्रशासकांच्या कारभाराला वेग

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) ऐतिहासिक विभाजनानंतर नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तीन स्वतंत्र बाजार समित्यांच्या कामकाजाला आता वेग आला आहे. प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समिती परिसरातील स्वच्छता, खड्डेमुक्ती तसेच नव्या समित्यांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यावर भर दिला जात आहे.



नाशिक, त्र्यंबक आणि पेठ स्वतंत्र बाजार समित्या


शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी थेट बाजार समिती (Agricultural Produce Market Committee)प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी खासदार तथा बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपली पालेभाजी व फळभाजी विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने नाशिकबाजार समितीचे विभाजन करून नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आणल्या आहेत. या निर्णयानुसार जुने संचालक मंडळ बरखास्त होऊन सध्या प्रशासकांचे कामकाज सुरू आहे.



बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू


कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन तीन नवीन समित्या अस्तित्वात आल्या आहेत. प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी बाजार समिती प्रशासन किंवा प्रशासकांशी संपर्क साधावा. तसेच माझ्याशी संपर्क साधल्यास मीदेखील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन असे बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) यांनी म्हटलें आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे