Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीला सरकारी यंत्रणांकडून वेग आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी), बेस्ट आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) माध्यमातून राज्यभर चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात ई-वाहनधारकांना चार्जिंगसाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.



एसटी महामंडळाने ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. सध्या राज्यातील ४५ ठिकाणी ही केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, एकूण २८५ चार्जर्स बसविण्यात आले आहेत. संबंधित आगारातील ई-बसची संख्या आणि गरज लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी किमान दोन ते कमाल १७ चार्जर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



ई-बसची संख्या वाढत असल्याने भविष्यात चार्जिंगची गरजही वाढणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने राज्यात आणखी १०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, सध्या एसटीच्या चार्जिंग केंद्रांवर केवळ महामंडळाच्या विद्युत बसांनाच चार्जिंगची सुविधा दिली जाते. खासगी ई-वाहनांना प्रवेश नसल्याने या सुविधेतून एसटीला कोणताही महसूल मिळत नाही.



दुसरीकडे, बेस्टने खासगी ई-वाहनांसाठीही चार्जिंग सुविधा खुली केली आहे. बेस्टच्या विविध आगार आणि टर्मिनसवर उपलब्ध असलेल्या या सुविधेतून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बेस्टला तब्बल ८.४५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. रिलायन्स बी.पी. मोबिलिटीसोबतच्या करारानुसार ही सेवा दिली जाते. बेस्टच्या आगारांमध्ये दररोज सरासरी १५ खासगी ई-वाहने चार्जिंगसाठी येतात.



कुर्ला, वांद्रे, वरळी, मरोळ, दिंडोशी, मालवणी, घाटकोपर आणि ओशिवरा यांसह विविध ठिकाणी चार्जिंग क्षमता वाढविण्यात आली आहे. चार्जिंगमधून बेस्टला प्रति युनिट ११.२२ रुपये, तसेच वाहन पार्किंगमधून दरमहा दोन हजार रुपये महसूल मिळतो.


याशिवाय राज्यातील ५०हून अधिक आरटीओ कार्यालयांमध्ये ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे एसटी, बेस्ट आणि आरटीओच्या माध्यमातून सरकारी चार्जिंग सुविधांचे जाळे अधिक व्यापक होण्याच्या दिशेने पावले पडत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.