मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या उद्योगांमध्ये, मोठ्या कारखान्यांमध्ये, महाकाय शहरांमध्ये वापरण्याचं तंत्रज्ञान आहे. प्रत्यक्षात हा एक गैरसमज आहे. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी एआयचा प्रभावी वापर सहज शक्य आहे. हा वापर फक्त मोठ्या शहरातच नाही तर घराघरांमध्येही शक्य आहे. याच विचारातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यात प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी एआयचा वापर करण्याचा निर्णय झाला. पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात जिल्ह्यात एआयच्या मदतीने प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी नियोजन सुरू झाले आणि १ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग हा देशातील पहिला एआय-सक्षम जिल्हा झाला. तंत्रज्ञान-आधारित प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले.
पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करून 'माझं दुसरीकडं हाय सुरू' या ...
एआयचा वापर फक्त समस्या सोडवण्यासाठी नाही तर भविष्यात कोणकोणत्या समस्या येऊ शकतात याचा अंदाज करून त्यावरील उपायांच्या नियोजनासाठीही करण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने एआयचा वापर सुरू केला. मार्व्हल या कंपनीच्या सहकार्याने प्रशासकीय पातळीवर प्रभावीरित्या एआय वापरण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी विभागांमध्ये एआयचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रशासकीय कारभार आणखी वेगवान, पारदर्शक आणि प्रभावीरित्या राबवण्यासाठी एआयची मदत घेतली गेली.
कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ...
एआय वापरण्यास सुरुवात झाल्यापासून प्रशासनाच्या कामाचा वेग वाढला. निर्णयक्षमतेत सुधारणा झाली. प्रशासकीय सेवांचा दर्जा सुधारला. या मॉडेलने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आणि नीती आयोगाने (NITI Aayog) देशभर एआय प्रभावी वापर करण्यासाठी काय करावे या संदर्भातल्या धोरणावर काम करायला सुरुवात केली.
मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाला गती ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कामातही एआयचा वापर सुरू झाला. यामुळे जिल्ह्यातील पोलिसांच्य कामात गुणात्मक बदल दिसून येण्यास सुरुवात झाली. गुन्हे घडल्यानंतर केवळ त्यांचा तपास करण्याऐवजी, एआय साधने नमुने ओळखण्यास, वर्तनाचे विश्लेषण करण्यास आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मार्गदर्शन आणि मदत करू लागली. यामुळे पोलीस बळाचा वापर प्रभावीरित्या करणे शक्य झाले. डेटाचे विश्लेषण करून अधिकारी संभाव्य धोके ओळखून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते उपाय करू लागले. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे, तपासकाम यात पोलिसांनी एआयचा प्रभावी वापर सुरू केला.
मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या विकासासाठी कृती आराखड्याला वेग देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवेतही एआयचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. आरोग्याशी संबंधित असलेल्या गंभीर समस्यांचा मागोवा घेऊन योग्य ते नियोजन करण्यास मदत होत आहे. जिल्ह्याच्या कोणत्या भागात कोणत्या आरोग्य सेवा प्राधान्याने देणे आवश्यक आहे याचे नियोजन करणे सोपे झाले आहे.
मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ...
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापनही एआयच्या मदतीने प्रभावीरित्या होऊ लागले आहे. एआयच्या मदतीने वन संपत्तीचे नियोजन आणि संरक्षण पण प्रभावीरित्या करणे शक्य झाले आहे. प्राणी, पक्षी आणि जैवविविधता जपण्यास मदत होत आहे. एआयमुळे केवळ सार्वजनिक सुरक्षितता सुधारली नाही, तर संवर्धन प्रयत्नांनाही गती मिळाली आहे. प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी या पलीकडे असलेल्या आव्हानांवर एआय कसे लागू केले जाऊ शकते, हे यातून दिसून आले.सिंधुदुर्गची ही कामगिरी संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. प्रगत तंत्रज्ञान केवळ मोठ्या शहरांमध्येच यशस्वी होऊ शकते या समजुतीला धक्का देत सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशातील पहिला 'एआय डिस्ट्रिक्ट' होण्याचा मान मिळवला आहे. जिल्ह्यातील विविध विभागांना एआयमुळे अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास आणि नागरिकांना उत्तम सेवा देण्यास मदत झाली आहे. सिंधुदुर्गचे हे मॉडेल भविष्य किती उज्ज्वल असू शकते याची एक झलक आहे.