Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेविरोधात तरुणांचे आंदोलन, दिपकेकडून माफीची मागणी

बीड : नीट पेपरफुटी विरोधात आधी सोशल मीडियात कॅम्पेन नंतर जंतरमंतरवर सोनम वांगचुकच्या सहकार्याने आंदोलन केल्यामुळे चर्चेत आलेला अभिजीत दिपके याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीजेपीचा (कॉक्रोच जनता पार्टी) अर्थात झुरळांच्या पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याने स्वतःच्या घराजवळ एका पोलिसाला वाईट वागणूक दिली. या प्रकरणी दिपकेने संबंधित पोलिसाची माफी मागावी, अशी मागणी पोलीस बॉइज संघटनेने केली आहे. ज्याला वाईट वागणूक दिली त्या पोलिसाचे पाय धरून त्याची जाहीर माफी मागा; अशी मागणी पोलीस बॉइज संघटनेने दिपकेकडे केली आहे.



पोलिसाला वाईट वागणूक देणाऱ्या दिपके विरोधात तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे आधी तरुणांसाठी आंदोलन करणारा आता तरुणांच्याच आंदोलनामुळे अडचणीत सापडला आहे. दिपकेने सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षकाला अर्थात पोलीस इन्स्पेक्टरला झापले होते. यामुळेच ज्याला वाईट वागणूक दिली त्या पोलिसाची सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीत पाय धरून माफी मागा, अशी मागणी पोलीस बॉइज संघटनेने दिपकेकडे केली आहे. विशेष म्हणजे स्वतःला तरुणांचा नेता म्हणवणाऱ्या दिपकेनेच चुकीचे वर्तन केल्यामुळे त्याच्याकडूनच पोलीस बॉइज संघटनेने माफीची मागणी केली आहे. या मागणीला अद्याप दिपकेने उत्तर दिलेले नाही.



याआधी केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन देताच वांगचुकने उपोषण सोडले. यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर कायदा केला. हा कायदा झाल्यानंतर दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विजय मिळाला असा प्रचार करत प्रायव्हेट दारू पार्टी केली. या घटनेनंतर दिपके मराठवाड्यातील त्याच्या घरी गेला, त्यावेळी घराजवळ त्याने एका पोलिसाला वाईट वर्तणूक दिली होती. हेच प्रकरण आता चिघळले आहे आणि पोलीस बॉइज संघटनेने दिपके विरोधात आंदोलन सुरू केले आहे. सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या दिपकेला सरकारने पोलीस संरक्षण दिले आहे. आपले कर्तव्य करत असलेल्या पोलिसाला सहकार्य करायचे सोडून दिपके जर अधिकाऱ्याला वाईट वागणूक देत असेल तर त्याने आधी स्वतःची वागणूक सुधारावी आणि पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी, अशी तरुणांची मागणी आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : 'सिप्ला'च्या पुणे गोदामाचा औषध विक्री परवाना रद्द

- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; 'रिअॅक्टिन प्लस' औषधांचा साठाही जप्त मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषध असलेल्या

Ashish Shelar : ॲड. आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : "ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन" (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान