Pune Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ , संमतीपत्र न दिल्यास सक्तीने संपादन

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येणाऱ्या एरोसिटीसाठी भूसंपादनाला आता वेग आला आहे. संमतीपत्र सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत संमती न दिल्यास संबंधित जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.



पुरंदर विमानतळासाठी सात बाधित गावांमधून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळासाठी निश्चित करण्यात आलेल्या १,२१८.७५ हेक्टर क्षेत्रातील बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कायद्यातील तरतुदीनुसार अतिरिक्त जमीन संपादित केली जाणार आहे. बाधित शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी त्यांच्या एकूण संपादित जमिनीच्या १० टक्के क्षेत्रफळाचा किंवा किमान १० गुंठे विकसित भूखंड देण्याची तरतूद आहे. या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जमिनीवर एरोसिटी विकसित केली जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय ठरावीक क्षेत्र भूसंपादनाच्या कक्षेत येत आहे. एरोसिटीसाठी एकूण २५३.२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांना ७ ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, कौटुंबिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना निर्धारित मुदतीत संमतीपत्रे सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.



संमती करारनाम्याद्वारे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या पुनर्वसन धोरणातील विशेष लाभ मिळणार आहेत. मात्र, निर्धारित मुदतीत संमती न दिल्यास प्रशासनाला सक्तीचा भूसंपादन निवाडा जाहीर करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कायद्यातील तरतुदींनुसार पुनर्वसनाचे विशेष लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.



“पुरंदर विमानतळाच्या बाधितांसाठी उभारण्यात येणाऱ्या एरोसिटीसाठी २५३.२१ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. ७ ऑगस्टपर्यंत संमतीपत्र देण्याची मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नियमानुसार सक्तीने भूसंपादन करण्यात येईल,” असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि