Nikita Rawal Viral Video : 'हे अत्यंत लज्जास्पद'; फॅनने चक्क कॅमेरासमोरचं केलं लिप-लॉक किस, अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल


















मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर एका महिला चाहतीने अभिनेत्रीला अचानक किस केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकारामुळे निकिता काही क्षणांसाठी गोंधळल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Nikita Rawal)


8 ऑगस्ट रोजी निकिता रावल एका कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोज देत होती. त्यावेळी एक महिला चाहती तिच्याजवळ आली आणि सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. निकितानेही हसत तिच्यासोबत फोटो काढला. सेल्फीनंतर चाहतीने आधी अभिनेत्रीच्या गालावर किस केले.  (Viral Video)



त्यानंतर मात्र या चाहतीने अचानक निकिताला जवळ घेत तिच्या ओठांवर किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे अभिनेत्री काही क्षणांसाठी अस्वस्थ झाल्याचे दिसले. तिने लगेच आपल्या ओठांवर हात ठेवला आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांचेही या घटनेकडे लक्ष गेले. (Bollywood News)


या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. चाहत्यांनी कलाकारांबद्दल व्यक्त करताना त्यांच्या वैयक्तिक मर्यादांचाही विचार करायला हवा, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. (Celebrity News)


निकिता रावलने बॉलिवूडसोबतच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’, ‘द हिरो - अभिमन्यू’ आणि ‘अम्मा की बोली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. अभिनयासोबतच ती विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असते. सध्या रेड कार्पेटवरील या अनपेक्षित घटनेमुळे निकिता रावलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ( Nikita Rawal Viral video)













Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या