 |
निर्णय योग्य ठरतील
मेष : या सप्ताहात आपली राशी चांगली प्रगती करणार आहे.व्यवसाय धंद्यामध्ये घेतलेले निर्णय योग्य ठरतील काही महत्त्वाचे सौदे हाती येतील नवीन करार होतील उत्पन्न वाढेल तसेच उलाढाली मध्ये वाढ होईल.नोकरीमध्ये काही सुवार्ता कानी येतील. वरिष्ठा बरोबर असलेले संबंध सुधारतील. महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते.खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. बौद्धिक क्षेत्रात वाव मिळणार आहे. प्रकृती मात्र जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा .व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळणार आहे. प्रवासाची शक्यता आहे. नव्या घटनांना काळजीपूर्वक हाताळणे फार आवश्यक आहे . विरुद्धी लिंगी व्यक्तीं बरोबर असलेल्या संबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार प्रमाणात जाणवणार आहेत. |
 |
महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल
वृषभ : एखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरविले असल्यास त्यामध्ये खूप विचार करावयास हवा. कारण खर्च वाढणार आहे. आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. छंदासाठी मित्र व सहकारी मदत करणार आहेत.ओळखी व मध्यस्थींमुळे महत्त्वाची कामे पार पाडण्यात यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये एखादे चांगले कार्य करणार आहात. आरामदायी वस्तूवर आपला खर्च होणार आहे. जोडीदाराशी चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत. भागीदारीमध्ये सर्वसाधारण फायदे होणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारे धोका पत्करू नका. आपले संवाद चांगले असल्यामुळे एखादी चांगली बातमी समजू शकेल.जमिनीचे व्यवहारात यश येणार आहे.समाजातील प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ संभवतात उत्पन्नात वाढ होईल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.आरोग्य चांगले राहील.
|
 |
कामाचा उत्साह वाढणार आहे
मिथुन : आपल्या स्वकष्टाला यश येणार आहे.सतत कार्यशील आणि प्रयत्नवादी रहा कंटाळा किंवा आळस करू नका. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आपल्या स्वतःच्या नैतिक नैपुण्या द्वारे यश मिळू शकणार आहे. दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असणार आहात.व्यापार व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. सन्माननीय व्यक्तींची गाठीभेटी व मैत्रीचे संबंध वाढतील. संततीच्या प्रगतीने समाधान वाटणार आहे. स्वतःच्या क्षमतेने प्रगती होणार आहे.कामाचा उत्साह वाढणार आहे.आर्थिक बाजू चांगली राहणार आहे सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अडथळे आले तरी त्यातून चांगले मार्ग निघणार आहेत. आत्मविश्वासाने व दृढनिश्चयाने कामे करा.कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. प्रगती होईल. |
 |
प्रवास कार्य सिद्ध राहतील
कर्क : या सप्ताहात आपण आत्मविश्वासपूर्वक कामे करणार आहात. सरकारी किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचा चांगल्या कार्यासाठी वापर करणार आहात.आपल्या कार्यक्षेत्र अधिकारांमध्ये वृद्धि होईल. रखडलेली कामे मार्गी लावण्यात येईल. जवळचे प्रवास संभवतात.प्रवास कार्य सिद्ध राहतील..मात्र कुटुंबात मध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचे आजारपण किंवा कुटुंबातील छोट्या-मोठ्या वादाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे मानसिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे आहे लोक आदराने बघणार आहेत.नोकरी मध्ये आपण केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठराल.अपेक्षित संधी मिळेल. प्रगती करू शकाल. वरिष्ठांकडून चांगले लाभ मिळणार आहेत.नवीन प्रयत्न फलदायी ठरणार आहेत. अपेक्षित लाभ मिळतील. |
 |
योग्य निर्णय होतील
सिंह : हा सप्ताह आपणास संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका. डोळ्या संबंधित तक्रारी येऊ शकतात. सरकारी किंवा वरिष्ठ व्यक्तींशी वाद-विवाद टाळा. या संदर्भात सतर्क राहणे फार आवश्यक आहे.भागीदारी मधील व्यवसायात लक्ष देणे फार आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदे होतील.एखाद्या नवीन प्रकल्पातून आपल्याला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जी योजना राबवत आहात त्याच्यात नशीब आपल्या बाजूने असणार आहे.योग्य निर्णय होतील. आपल्या कारकिर्दीत चांगली प्रगती होणार आहे.आपलं कार्यक्षेत्र नवीन नवीन चांगले मिळून आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल सामाजिक तसेच धार्मिक कार्यकर्ते सक्रिय योगदान द्यायला सामाजिक मान-सन्मान वाढेल महत्वाचे पद मिळू शकते. दीर्घकाळ घडलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. |
 |
आर्थिक बाबतीत व वृद्धी होणार आहे
कन्या : प्रेम प्रकरणांमधून सावध असावे फसवणुकीची शक्यता आहे.परिस्थितीचे भान ठेवणे क्रमप्राप्त ठरेल विरोध वाढू शकतो. आपल्याला त्यापासून मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींनी बोलताना फार सावध राहणे आवश्यक आहे. एखादा शब्दाने वाद-विवाद किंवा मान हानी चे प्रसंग येण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आपण सर्व प्रकारे सावध राहणे फारच आवश्यक आहे. मात्र आपण आपल्या कार्यात सातत्य आणि नियोजनबद्ध काम केल्यास आपल्याला निश्चित यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रगती आहे आर्थिक बाबतीत व वृद्धी होणार आहे.जमीन जुमला तसेच स्थावर मालमत्ता याविषयीचे दीर्घकाळ रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. |
 |
योजना सफल होऊ शकतात
तूळ : काही खर्च अचानक समोर येणार आहेत. शिवाय आपल्या झोपेवर पण याचा परिणाम होणार आहे. निश्चितच प्रकृती स्वास्थ्यावर त्याचा याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्या स्त्रिया कामासाठी बाहेर पडत पडत आहेत, त्यांनी आपली स्वतःची काळजी घेणे फार आवश्यक आहे. सर्व गोष्टीत सद विवेकबुद्धीने विचार करणे फार आवश्यक आहे.या सर्व काळामध्ये आपल्या जोडीदाराचा सल्ला फार मोलाचा ठरणार आहे नवीन व्यवसायासाठी बँक बॅलन्स साठी यांचा चर्चा करून निर्णय ठरवा. नवीन करारातून आपणास चांगले लाभ होणार आहेत.कुटुंबात पत्नीचा सल्ला अवश्य घ्या. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मतास उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. व्यवसाय धंद्याच्या दृष्टिकोनातून पोषक निर्णय घेतले जातील फायद्यात राहाल व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होऊ शकतात. |
 |
सकारात्मक रहा
वृश्चिक : वैवाहिक जीवनामध्ये कडू-गोड प्रसंग येण्याची शक्यता आहेकुटुंबातील लहान मोठ्या वाद-विवाद निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करा.आपल्या स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कुटुंबातील ज्येष्ठांचा मान ठेवणे हिताचे ठरेल..सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये मात्र कुटुंबांमध्ये शांती असणार आहे. काहींचे विवाह अचानक ठरवून होतीलही. नवीन योजना आखून त्या कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मात्र सर्व बाबतीत धैर्याने समोर जाणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नको. दूरदर्शी प्रमाणे विचार करावे. निर्णय घेताना पूर्ण सावधगिरी असणे महत्वपूर्ण असणार आहे.प्रवास, उच्च शिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हा सप्ताह आपणास अनुकूल आहे.सकारात्मक विचाराचे फार आवश्यकता आहे.एकूण सर्व बाबती मध्ये सावध राहणे हिताचे ठरेल. |
 |
अपेक्षित यश मिळेल
धनु : तुमचे काम करण्याची जास्त कष्ट करण्याची तयारी असेल तर हा कालावधी तुम्हाला निश्चित यश मिळवून देणारा असणार आहे.प्रयत्नशील राहणे फायद्याचे ठरेल. या कालावधीमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. आपले निर्णय योग्य होण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेणे.किंवा किंवा कोणाशी चर्चा करून ठरवले तर चांगले होतील.इतरांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याचे थोड्याशा कुरबुरी असतील. व्यवसाय मध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये चांगला समतोल साधणार आहात. खूप कष्ट करून तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला समृद्धी, उत्पन्न यांचा चांगला लाभ मिळणार आहे. त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थैर्य यावर होणार आहे.विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. |
 |
सन्मानाचे योग आहेत
मकर : आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेम प्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता आहे.पैसे अडकल्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते.तरीसुद्धा वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती करू शकाल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळणार आहे. तुमची कष्ट करण्याची तयारी असल्यास कष्टाचे चीज होणार आहे. त्यासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी सन्मानाचे योग आहेत. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. कष्टाची तयारी ठेवा आर्थिक फायदे निश्चित. नोकरीतील आपल्या कामाविषयी चे ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे त्याचा आपल्यालाच फायदा होईल हे लक्षात घ्या. कष्टाला फळ मिळेल. |
 |
समस्या यशस्वीपणे सोडवाल
कुंभ : आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. तुम्ही सर्व अडचणींवर चांगल्या तऱ्हेने मात करणार आहे. आज शत्रूचा पराजय होईल. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाब चांगली सांभाळा. मित्रांनी अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आपणास लाभकारक ठरणार आहेत. जमिनीच्या व्यवहारातून फायदे होतील. मुलांच्या यशामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. मात्र अति आत्मविश्वास टाळणे हितकारक राहणार आहे. घरातील व्यक्तींच्या आरोग्यविषयक तक्रारी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नाती जपा. काहि गोष्टीने विनाकारण मनस्ताप होण्याची शक्यता आहे. किंवा आपल्या प्रेमळ भावनांना ठेच लागण्याची शक्यता आहे.व्यवसाय धंदे तील समस्या यशस्वीपणे सोडवण्यात यश मिळेल व्यवसाय जुनी येणी येतील.नोकरीविषयक समस्या सुटतील अपेक्षित यश मिळेल. |
 |
धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे
मीन : कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका.स्वतःचे काम स्वतः करा इतरांवर अवलंबून राहणे नुकसानकारक ठरू शकते शांतपणे निर्णय घेण्याची गरज. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र परदेशी संबंधातून तुम्हाला फायदा होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. या कालावधीमध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एखादा धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. करियर मध्ये नवीन प्रकल्प हाती घ्याल त्यात यश येणार आहे. उद्योग व्यवसायातून फायदा मिळणार आहे. चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होण्याची शक्यता.धार्मिक कार्याला हजेरी लावाल. नवीन संधीची शक्यता आहे. फायदे होतील.तरुण-तरुणींचे नोकरी विषयक प्रश्न सुटतील. प्रेमात यश संभवते काहींचे विवाह ठरतील.
|