Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. सातारा, महाबळेश्वर आणि पुणे परिसरातील काही नागरिक नेपाळमध्ये अडकले असून, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde)


शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्र सरकार, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन टीमही या परिस्थितीत सक्रिय असून, नेपाळमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान, परिवहन विभागाच्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाचेही शिंदे यांनी कौतुक केले. या अभियानातून सुमारे १ लाख ६० हजार अमराठी नागरिकांनी मराठी भाषा शिकली, तर मुंबईतील सुमारे १५ ते २० हजार ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अन्य भाषिकांमध्ये व्यवहारातील मराठी शिकण्याची गोडी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)



रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईत आलेल्या महिलांनी शिंदे यांना राखी बांधली. यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह महिलांसाठीच्या विविध योजना सुरूच राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. (Eknath Shinde)



‘प्रो गोविंदा’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे लक्ष्य


पारंपरिक गोविंदा उत्सवाला व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. गोविंदांचा विमा, उत्सवासाठी सुट्टी आणि राज्यातील क्रीडा प्रकारांमध्ये गोविंदाचा समावेश यांसारखे निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना स्पेनमध्येही पाठवण्यात आल्याचे सांगत, गोविंदा हा टीमवर्क, शिस्त आणि सांघिक कौशल्याचा खेळ असून तो भविष्यात कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम