मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी अभिनंदन केले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025)च्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांसह आदिवासी विकास विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. व्यवस्थापननिहाय जिल्हा परिषद ८,४८१, महानगरपालिका १,३०६, आदिवासी विकास विभाग १,६०१, खासगी शैक्षणिक संस्था १,४५१, नगरपालिका २२६ आणि शासकीय विद्यानिकेतन ५४ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम केला जाईल, ...
पदनिहाय पाहता, इयत्ता १ली ते ५वीसाठी ७,५४१, ६वी ते ८वीसाठी ४,२०७, ९वी ते १०वीसाठी १,११९ आणि ११वी ते १२वीसाठी २५२ पदांचा समावेश आहे. गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबविण्यात आल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. नव्याने निवड झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Dada Bhuse)
दरम्यान, शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पवित्र पोर्टल लॉगिनवर निवडीची स्थिती पाहता येणार असून, संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती देण्यात येत आहे.