Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने 'महिला टी-२० आशिया चषक २०२६' या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. आठ संघांचा सहभाग असलेली ही मालिका २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबई येथे पार पडणार आहे. २८ ऑगस्ट रोजी गट 'अ' मधील हाँगकाँग विरुद्ध थायलंड सामन्याने स्पर्धेचा नारळ फुटेल. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला ५ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.या स्पर्धेचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. सर्व सामने 'दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम'वर दिव्यांच्या लखलखाटात (डे-नाईट) पार पडतील. टी-२० स्वरूपातील ही महिला आशिया चषकाची ६ वी आवृत्ती आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून भारताने २०१२, २०१६ आणि २०२२ मध्ये असे ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१८ मध्ये बांगलादेशने तर गेल्या आवृत्तीत श्री लंकेने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.



गट रचना


गट 'अ': भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आणि थायलंड.
गट 'ब': श्री लंका (माजी विजेते), बांगलादेश, इंडोनेशिया आणि यजमान संयुक्त अरब अमिराती.



स्पर्धेचे स्वरूप


गट फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांशी एक-एक सामना खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
पहिला उपांत्य सामना: १० सप्टेंबर (गट 'अ' मधील विजेता विरुद्ध गट 'ब' मधील उपविजेता)
दुसरा उपांत्य सामना: ११ सप्टेंबर (गट 'अ' मधील उपविजेता विरुद्ध गट 'ब' मधील विजेता)

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या