India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. (India U19 Squad)


या मालिकेतील तीनही एकदिवसीय सामने तसेच पहिला बहुदिवसीय सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबादमध्ये होईल. (India U19 Squad)



सेहवागच्या मुलाला पुन्हा संधी :


वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो दिल्ली प्रीमियर लीग २०२६मध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळत असून, त्याच्या आक्रमक फलंदाजीची तुलना वडील वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली जात आहे. आर्यवीरने २०२४च्या कूचबिहार ट्रॉफीत मेघालयाविरुद्ध २९७ धावांची शानदार खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली होती. (India U19 Squad)



द्रविडच्या मुलालाही स्थान :


भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याचाही एकदिवसीय संघात समावेश आहे. यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या अन्वयने जुलैमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील संघाच्या श्रीलंका दौऱ्यात ८७ धावांची खेळी करत प्रभावित केले होते. मात्र, आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड या दोघांनाही बहुदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. (India U19 Squad)



भारताचा अंडर-19 एकदिवसीय संघ :


लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित उलविड, रोहित राव, मोहित यादव, व्ही. व्यंकट आणि काव्या पटेल. (India U19 Squad)



बहुदिवसीय सामन्यांसाठी संघ :


यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यादव, इशान ओम, अयान अक्रम, प्रणव सिंह, प्रणव अरविंद आणि अरविंद राव. (India U19 Squad)



भारत U19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया U19 वेळापत्रक :


पहिली वनडे: १८ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता
दुसरी वनडे: २१ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता
तिसरी वनडे: २३ सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९ वाजता
पहिला बहुदिवसीय सामना: २७ ते ३० सप्टेंबर, राजकोट — सकाळी ९.३० वाजता
दुसरा बहुदिवसीय सामना: ५ ते ८ ऑक्टोबर, अहमदाबाद बी ग्राउंड — सकाळी ९.३० वाजता (India U19 Squad)


सेहवाग आणि द्रविड यांच्या मुलांना मिळालेल्या संधीमुळे या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

Comments
Add Comment

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट