Friday, August 7, 2026

Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने 'महिला टी-२० आशिया चषक २०२६' या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. आठ संघांचा सहभाग असलेली ही मालिका २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबई येथे पार पडणार आहे. २८ ऑगस्ट रोजी गट 'अ' मधील हाँगकाँग विरुद्ध थायलंड सामन्याने स्पर्धेचा नारळ फुटेल. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला ५ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.या स्पर्धेचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. सर्व सामने 'दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम'वर दिव्यांच्या लखलखाटात (डे-नाईट) पार पडतील. टी-२० स्वरूपातील ही महिला आशिया चषकाची ६ वी आवृत्ती आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून भारताने २०१२, २०१६ आणि २०२२ मध्ये असे ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०१८ मध्ये बांगलादेशने तर गेल्या आवृत्तीत श्री लंकेने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

गट रचना

गट 'अ': भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आणि थायलंड. गट 'ब': श्री लंका (माजी विजेते), बांगलादेश, इंडोनेशिया आणि यजमान संयुक्त अरब अमिराती.

स्पर्धेचे स्वरूप

गट फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांशी एक-एक सामना खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य सामना: १० सप्टेंबर (गट 'अ' मधील विजेता विरुद्ध गट 'ब' मधील उपविजेता) दुसरा उपांत्य सामना: ११ सप्टेंबर (गट 'अ' मधील उपविजेता विरुद्ध गट 'ब' मधील विजेता)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >