Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर


मुंबई : मराठा समाजाला मिळालेली कुणबी जात प्रमाणपत्रे आणि त्यांची वैधता रद्द करण्यामागे आपला दबाव असल्याचा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप पूर्णपणे निराधार असून, यासंदर्भात आपली नार्को टेस्ट करण्याची जरांगेंची मागणी स्वीकारण्यास आपण पूर्णपणे तयार आहोत, असे सडेतोड प्रत्युत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जात पडताळणी समित्या या स्वतंत्र व अर्धन्यायिक संस्था असल्याने त्यात मंत्री किंवा राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारसह महसूलमंत्री बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच जात पडताळणी समित्या कुणबी प्रमाणपत्रे रद्द करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी जरांगेंच्या सर्व आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. "नार्को टेस्ट करण्यास माझी कोणतीही हरकत नाही. त्यासाठी माझी पूर्ण परवानगी आहे," असे सांगत त्यांनी जरांगेंचे आव्हान स्वीकारले.



बावनकुळे म्हणाले की, "जात पडताळणी विभाग ही एक अर्धन्यायिक (क्वासी-ज्युडिशियल) संस्था आहे. या समितीला कायदेशीर आणि स्वतंत्र अधिकार असतात. या प्रक्रियेत कोणताही मंत्री, अधिकारी अथवा राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. मी स्वतः जरी प्रयत्न केला, तरी जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलण्यास सांगू शकत नाही. असा हस्तक्षेप या राज्यातच नव्हे तर देशात कुठेही शक्य नाही. त्यामुळे हा आरोप मुळातच चुकीचा आहे."


जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयावर कोणाचा आक्षेप असल्यास कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. समिती पुरावे आणि कागदपत्रे तपासूनच निर्णय घेते. मात्र, हा अंतिम निर्णय नसतो. जर कोणावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल, तर त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उच्च न्यायालयाकडून तातडीने स्थगिती किंवा न्याय मिळू शकतो. त्यामुळे आंदोलकांनी ही कायदेशीर प्रक्रिया अवलंबणे योग्य ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.



संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेचा वाद संपुष्टात


याच पत्रकार परिषदेत महसूलमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील भाईंदरपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. राष्ट्रीय उद्यानाची तब्बल १ हजार १०० एकर जागा खासगी दावेदारांच्या घशात घातली जात असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. "खासगी दावेदार आणि वन विभाग यांच्यात सुरू असलेल्या १ हजसर १०० एकर जागेच्या वादावर आम्ही अंतिम अर्धन्यायिक आदेश काढला असून, ही संपूर्ण जागा अधिकृतपणे 'वन विभागाच्या' नावे करण्यात आली आहे. वनाची जमीन वनालाच राहिली पाहिजे या धोरणावर सरकार ठाम आहे," असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व