Railway Alarm chain pulling : रेल्वेतील 'अलार्म चेन'चा गैरवापर टाळा, भुसावळ विभागाचे प्रवाशांना आवाहन

Railway Alarm chain pulling : रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये दिलेली 'अलार्म चेन पुलिंग' (ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. मात्र, अलीकडच्या काळात या अलार्म चेनचा अनावश्यक आणि किरकोळ कारणांसाठी गैरवापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रत्येक प्रकरणात रेल्वे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचा इशारा भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे.


चुकून किंवा गफलतीने साखळी ओढणे, उशिरा आलेल्या सहप्रवाशाला गाडीत चढता यावे म्हणून ट्रेन थांबवणे, मोबाईल किंवा वस्तू खाली पडल्यामुळे साखळी ओढणे अशा नियमबाह्य कृर्तीमुळे रेल्वे वाहतुकीवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. या गैरवापरामुळे केवळ त्याच गाडीचे नव्हे, तर मागोमाग येणाऱ्या इतर अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. काही मोजक्या प्रवाशांच्या अनधिकृत सोयीसाठी शेकडो प्रवाशांना विलंब, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागतो.



एप्रिल ते जुलैदरम्यान ७२२ प्रकरणांची नोंद


भुसावळ विभाग अशा अवास्तव अलार्म चेन पुलिंगच्या घटनांवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते जुलै २०२६ या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागात अलार्म चेन पुलिंगची एकूण ७२२ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यांपैकी ६७४ व्यक्तींवर कारवाई करून त्यांना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३६ हजार ४१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.



वेळेवर स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन


भुसावळ विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वीच स्थानकावर पोहोचावे व मर्यादित सामान सोबत ठेवावे. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी स्टेशन मॅनेजर कार्यालयात उपलब्ध असलेल्या बॅटरीचलित गाड्या व व्हीलचेअरचा वापर करावा, जेणेकरून वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचून सुरक्षितपणे गाडीत चढता येईल आणि अलार्म चेन ओढण्याची वेळ येणार नाही.



कायदेशीर कारवाईचा इशारा


रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १४१ नुसार विनाकारण अथवा अनधिकृतपणे अलार्म चेन ओढणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे